दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग ८
माधव स्टडी रूमच्या एका कोपऱ्यातील जुन्या लाकडी खुर्चीत बसला होता...
खिडकीबाहेर पावसाच्या घणघणीतल्या सरी कोसळत होत्या, आणि त्यांच्या ठणकाव्याने खोलीत एक उदास वातावरण पसरलं होतं...
त्याने डोळे मिटले होते... मनात गौरवीच्या आठवणींचा भडिमार सुरू होता... तिचं हसू, तिच्या डोळ्यांतली ती चमक, आणि आता तिच्या चेहऱ्यावर आलेली ती वेदनाची सावली...
प्रत्येक क्षण, प्रत्येक शब्द, प्रत्येक दृश्य तो पुन्हा-पुन्हा डोळ्यांसमोर उभं करत होता... पण या सगळ्याच्या मध्यभागी एक अनामिक व्यथा जागृत होत होती... बोचरी, हाडांपर्यंत खुपसणारी...
प्रत्येक क्षण, प्रत्येक शब्द, प्रत्येक दृश्य तो पुन्हा-पुन्हा डोळ्यांसमोर उभं करत होता... पण या सगळ्याच्या मध्यभागी एक अनामिक व्यथा जागृत होत होती... बोचरी, हाडांपर्यंत खुपसणारी...
ती व्यथा म्हणजे काय...? संशय की प्रेमाची ओढ...?
माधवच्या मनात प्रश्नांची पूड उधळत चालली होती...
तो स्वतःच्याच विचारांच्या जाळ्यात अडकला होता...
माधवच्या मनात प्रश्नांची पूड उधळत चालली होती...
तो स्वतःच्याच विचारांच्या जाळ्यात अडकला होता...
तेवढ्यात खोलीच्या दाराकडे पावलांचा हलका शब्द ऐकू आला... त्याची आई धीर धरत, जाणीवपूर्वक पावलं टाकत त्याच्या जवळ येत होत्या... त्यांचा चेहरा कृत्रिम काळजीचा मुखवटा घालून होता... तर डोळ्यांत चिंतेची खोटी लालसा आणि ओठांवर हलकीशी हसण्याचा प्रयत्न होत होता...
पण आवाजात मात्र कठोरता आणि धमकीची झाक होती...
पण आवाजात मात्र कठोरता आणि धमकीची झाक होती...
त्या त्याच्या समोर थांबल्या आणि कडवट स्वरात बोलल्या, “तुला काय झालं रे माधवा...? असे डोळे मिटून बसून काय विषारी विचार करतोयस...? तुझ्या मनात काय चाललंय...? तिचा विचार करत असशील तर तु आत्ताच काढून टाक... तीने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केले तरीही तुझं अजून मन भरलं नाही का...? जो तिच्या विचारांत सर्रास हरवलास तो...”
त्यांच्या डोळ्यांत क्षणभर भीतीची हलकीशी झलक चमकली...
त्यांच्या डोळ्यांत क्षणभर भीतीची हलकीशी झलक चमकली...
ती भीती काय होती...? सत्य बाहेर येण्याची की माधवच्या मनातल्या संशयाची...? पण ती झलक लगेचच कठोरतेच्या आवरणाखाली दडपली गेली...
त्याच्या आईच्या हातात एक छोटासा ट्रे होता, त्यात चहाचा कप आणि बिस्किटं होती... पण तो सर्व काही फक्त दिखावा होता...
माधव थोडा थबकला... त्याने हळूच डोळे उघडले... त्याचा चेहरा गोंधळलेला होता, पण डोळ्यांत प्रश्न ठामपणे उमटवला होता... तो हळू आवाजात बोलला,
“आई… एकच प्रश्न मला सतावत आहे... मी अजूनही समजू शकलो नाही... गौरवी बाथरूममध्ये आंघोळ करत होती… आणि तो मुलगा पूर्ण भिजलेला बेडरूम मधून बाहेर आला...
हे कसं शक्य आहे...?”
तो खुर्चीत पुढे झुकला, हात डोळ्यांवर फिरवत...
“ कारण बाथरूमचं दार तर आतून लॉक होतं ना...? आणि बेडरूमचा दरवाजा सुद्धा आतून लॉक होता... मग तो मुलगा आत कसा गेला...? हे सगळं इतकं सहज कसं घडलं...?
मी सगळं नीट चेक करून पाहिलं होतं… दोन्ही दार लॉक होतं...!” त्याच्या आवाजात आता संशयाची स्पष्ट लाट उमटली होती... हाताची बोटं नकळत एकमेकांत गुंफली जात होती, जणू ते विचार धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असावेत...

स्टडी रूमच्या भिंतीवर लटकलेल्या घड्याळाची काटे टिकटिक करत होते, आणि ते आवाज माधवच्या गोंधळ्याला आणखी तीव्र करत होते...
त्याची आई क्षणभर थबकली..., त्यांचा चेहरा पांढरा पडला, ओठ कोरडे झाले... हातातला ट्रे हलकासा हलला, चहाचा कपाने हलकीशी खडखडाट केली... डोळ्यांत भीतीची लाट उसळली, पण त्यांनी स्वतःला लगेच सावरलं...
आणि जरा जास्तच मोठ्या, रागमिश्रित आवाजात त्या म्हणाल्या,
“अरे बाबा! तू काय बोलतोयस...? ती मुलगी फार हुशार आहे रे...! अशा नाटकं करणाऱ्या मुली काय काय करत नाहीत...? अरे तीनेच आतून लॉक करून घेतले असेल दरवाजा... त्याला बाहेर काढून... त्यात काय न करण्याएवढं मोठं आहे... अरे ती तुझा विश्वास संपादन करण्यासाठी असलीच सगळी खेळी करून आली... तू साधा आहेस म्हणून तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली तिनं... आता तिच्याकडे पुन्हा पाहू नकोस... तिला विसर... आम्हाला तुझी काळजी आहे रे बाळा...”
त्यांचा आवाज जणू स्वतःलाच समजावत होता... पण माधवचे मन चलबिचल होऊ लागले...

त्याच्या आईच्या डोळ्यांतली भीती आता संशयात बदलली होती... त्यांनी तो ट्रे टेबलावर ठेवून, हात धुतले आणि मागे वळल्या, जणू या बोलण्याला पूर्णविराम द्यायचा प्रयत्न करत...
माधवच्या मनात एकच प्रश्न भोवत फिरत होता... तीव्र, अस्वस्थ करणारा, अंतर्मनाला खोलवर खुपसणारा....
“जर गौरवी दोषी असती… तर ती अशी विनवणी केली असती का...? तिच्या डोळ्यांतली ती खरी वेदना, तिच्या हातांचा थरथराट, ते हृदय फाडणारं आवाहन..., हे सगळं नाटक कसं असू शकतं...?” तो विचार करत बसला होता...
गौरवीच्या चेहऱ्यावरची ती निरागसता त्याला आठवत होती... लग्नाच्या पहिल्या रात्रीची ती हसतमुख ओढ, सकाळी चहा घेऊन येण्याची तिची सवय, आणि आता तिच्या जाण्याच्या वेळी ती हळुवार डोळे... छातीत द्वंद्वाची ज्वाला धगधगत होती... विश्वास आणि संशय यांच्यातील युद्ध त्याचं डोकं गोंधळून टाकत होतं...
तो अचानक उठला... अनिश्चित पावलं टाकत खिडकीजवळ गेला आणि बाहेर पाहू लागला...
पावसाच्या घणघणीत गौरवी भिजत चालली होती... तिचा ओला ब्लाउज शरीराला चिकटलेला होता, केस ओले झाले होते आणि पाण्याच्या धारा चेहऱ्यावरून वाहत होत्या... आपले हात तिने छातीत दाबले होते, जणू तुटलेल्या जखमी झालेल्या ह्रदयाच्या वेदना थांबवण्याचा प्रयत्न करत असावी... तिची चाल मंद होती, पण प्रत्येक पावलात वेदनेचा ठसा होता... रस्त्यावर पाण्याचे पूल तयार झाले होते, आणि तिचे पाय त्यात बुडत होते...

तिच्या पाठीमागे लोंबकळणारा तो एकटेपणा आणि हताशता माधवच्या हृदयात पहिल्यांदाच कळकळीची तीव्र लहर उसळवत होती... जणू कुणीतरी आतून चाकू खुपसल्यासारखं त्याला वाटत होतं...
“काय खरंच मी चूक केली का…?” त्याच्या ओठांतून हळूच शब्द निसटले...
“तिच्या निरागसपणावर शंका घेऊन, तिला घराबाहेर ढकललं का…? तिच्या प्रेमाला मी न्याय दिला नाही का…? ती खरंच निर्दोष आहे का..?”
खिडकीच्या काचेवर त्याने आपला उजवा हात ठेवला, आणि पावसाच्या ठणकाव्याने हृदयाचे ठोके मंदावले...

तेवढ्यात मागून छोट्या बहिणीचा आवाज आला...
कपटी, सावरलेल्या स्वरात, जणू एखादी जाळी विणत असावी...
“दादा… तीने जाताना आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून फेकून दिले... तुला परत देण्यासाठी... हे बघ..." असं म्हणत संस्कृतीने आपल्या हातात असलेले तुटलेले मंगळसुत्र माधवला दाखवत बोलू लागली...

माधवने मागे वळून ते मंगळसुत्र आपल्या हातात घेतले... आणि त्या मंगळसूत्राकडे भरलेल्या डोळ्यांनी बघू लागला... मधवची अशी अवस्था पाहून संस्कृतीने म्हणजेच माधवच्या बहिणीने लगेचच माधवचे कान भरायला सुरुवात केले...
" काळजी करू नकोस दादा आणि दुःखी सुद्धा होऊ नकोस... अशा मुली घरात ठेवल्या तर घराची इज्जतच जाते... ती फसवी आहे... तिच्यावर विश्वास ठेवू नकोस... बघ तीच्या मनात पापं होते... आणि म्हणूनच तीने तु लग्नात तीच्या गळ्यात घातलेले मंगळसुत्र काढून फेकून दिले... यावरूनच कळते त्या मुलीची लायकी काय आहे ती... ती तुझ्यासाठी योग्य नव्हतीच कधी... आणि आम्ही तुझ्यासाठीच , तुझ्या भल्यासाठीच हे सगळं सहन केले... पण आता नाही... तू आता तीला विसरून जा....” तिच्या शब्दांतली खोटी काळजी आणि आत दडलेला द्वेष तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होता... पण माधवचे कान तिच्याकडे आणि डोळे मंगळसुत्राकडे स्थिरावले होते...
संस्कृती बाईने विझलेल्या निखाऱ्यात पुन्हा फुंकर घालून आग पेटवली होती... आणि ती आग पेटवून ती स्टडीरुमधून जाऊ लागली... आणि स्टडी रुमच्या दारात उभी राहून, हातात मोबाईल धरून, चेहऱ्यावर आनंदाचे भाव आणि ओठांवर आलेले हास्य माधव समोर असून सुद्धा बघू शकत नव्हता...
पण बहिणीच्या शब्दांनी मात्र माधवचा चेहरा बदलला... आणि कपाळावर सुरकुत्या पडल्या, हातांची बोटं घट्ट एकमेकांत गुंफली गेली... आणि त्या क्षणी त्याच्या मनातलं विश्वासाचं बंधन हळूहळू… पण ठामपणे तुटायला लागलं...
माधवच्या घरातल्या या लोकांवर त्याचा विश्वास होता का...? की गौरवीचं प्रेम त्याच्यासाठी खरं होतं...?
माधव खिडकीतून पाहतच राहिला आणि स्वतःलाच हरवत गेला... गौरवीची चाल अजूनही मंदच होती... पावसाच्या धारांनी तिचं मन ओरबाडल्यासारखं वाटत होतं...
ती रस्त्याच्या वळणावर पोहोचली, आणि एक क्षण थांबली...
तीने मागे वळून पाहिलं का...? नाही, ती पुढे चालत राहिली...
तीने मागे वळून पाहिलं का...? नाही, ती पुढे चालत राहिली...
माधवच्या गळ्यात एक गाठीसारखा ताण हळूहळू चढत गेला... स्टडी रूम आता शांत झाली होती, फक्त पावसाचा आवाज आणि त्याच्या हृदयाचे ठोके फक्त त्याला ऐकू येत होते...
तो परत खुर्चीवर बसला, पण मन शांत झालं नव्हतं... संशयाची ही लाट आता घरातल्या सगळ्यांना वेढत होती...
काय करावं...? गौरवीला घटस्फोट द्यायचं का...? ती अशी का वागली असेल...? तीला या घरात काय कमी होती...? सगळं किती चांगले आणि आनंदाने जगत होतो... मग ती इतकं खालच्या पातळीवर का उतरली...? माझ्याकडून तीला सुख मिळत नव्हते का...? मी तर पुर्णपणे तीला सुख देत होतो... मग तीने असं नीच कृत्य का केले...?"
अश्या एक ना अनेक प्रश्नांची ही सरबत्ती आता थांबायचं नावच घेत नव्हती...

क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा